लोक न्यूज-
राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गुरुवार(ता,१२)रोजी येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात  सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी
अभिवादन करून या निमित्त आयोजित आनंद नगरीचे उदघाटन केले, पालिकेच्या शिक्षण खात्याचे पर्यवेक्षक एम,आर,गणवीर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती ,या प्रसंगी आनंदनगरीत छोट्या मुलां-मुलींना आनंद नगरी आयोजन मागचा उद्धेश समजाऊन सांगण्यात आला, पालकांनी या प्रसंगी मोठी गर्दी केली होती, या कार्यक्रम प्रसंगी श्रीमती टाकळकर, श्रीमती थोरात,व श्री तगरे उपस्थित होते.