लोक न्यूज-
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या स्वीकृत संचालकपदी माजी आमदार, तथा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ यांची निवड घोषित करण्यात आली, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अमळनेरात भाजपाच्या गोटातील नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून वाघ यांना संधी देण्यात आली आहे. अमळनेर तालुका सह जळगाव जिल्ह्यातील भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. यात अमळनेर भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, राकेश पाटील, महेंद्र बोरसे, महेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मुरलीधर महाजन, रणजितसिंग राजपूत आदींनी अभिनंदन केले.

