लोक न्यूज-
अमळनेर नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आज रोजी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर, निवेदनात म्हटले आहे की, फायनल प्लॉट 123 मधील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भातील झालेल्या वादात आपले मुख्याधिकारी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर काही राजकीय मंडळी आपली पोळी शेकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करीत असून नगरपालिकेच्या कामात रोज कोणी ना कोणी ढवळाढवळ करीत असून काही तथाकथित खंडणीबहादर (ज्यांचा सद्या अमळनेर शहराशी काही घेणे देणे नाही अशी मंडळी शहराबाहेर राहून गावातील काही दुःखी आत्म्यांच हितसंबंध (आर्थिक) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण न केल्यामुळे बिनबुडाचे आरोप करून नगरपरिषद कर्मचाऱ्याची कोणत्या न कोणत्या कारणावरून बदनामी करीत आहेत. फायनल प्लॉट क्र.१२३मधील नियोजित व्यापारी संकुल हे नगरपरिषदेच्या मालकीच्या शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडानुसारच कायदेशीर प्रक्रिया राबवून नगरपरिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठीच तयार केले जात असून त्या जागेवर राहणाऱ्या सर्व नागरिकांचे पुनर्वसन करूनच नियोजित व्यापारी संकुलाचे बांधकाम केले जात आहे व या बाबतीत सर्व अतिक्रमित नागरिकांनी आम्ही स्वतः अतिक्रमण काढून घेऊ असे परिषदेस लेखी दिलेले असताना पद्धतशीर नियोजन करून कोणी आत्महत्या करण्याचे षडयंत्र करीत आहेत (त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी लिहून दिल असे असतानाही काही मंडळी चिथावणीखोर वक्तव्य करून नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्याना पर्यायाने नगरपरिषदेला मुद्दाम बदनाम करीत असून शहराचे वातावरण बिघडवून अशांतता माजवून कर्मचाऱ्यांना देखील शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम करीत असल्यामुळे कर्मचारीवर्ग धास्तावलेला असल्याने अश्या मंडळींवर आपण योग्य ती कारवाई करावी असे न घडल्यास सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील याची नोंद घेऊन सहकार्य करावे यावेळी अमळनेर
नगरपरिषदेतील अधिकारी सह कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.