अमळनेर-लोक न्यूज
नेहरू युवा केंद्र जळगावच्या वतीनेळृ अमळनेर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्सवात पार पडल्या. व्हॉलीबॉल, धावणे, खो-खो व गोळाफेक या खेळांचा समावेश होता. स्पर्धेत २७८ खेळाडूंनी भाग घेतला.
जी.एस. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील केद्र प्रमुख किराण शिसोदे ,मुख्याध्यापक डि एच ठाकुर सर तर प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन क्रीडा संचालक प्रा. ए.के. अग्रवाल यांच्याशुभ हस्ते मैदानाची पुजा करुन श्रीफळ फोडुन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बाळा पवार तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ उपस्थित होते. वैयक्तिक व सांघिक प्रकारात झालेल्या या खेळात व्हॉलीबॉल मध्ये सहा संघांमध्ये ६२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला तर १०० मीटर धावणे स्पर्धेत ६३ खेळाडू गोळाफेक ५२ खेळाडूंनी तर खो-खोमध्ये आठ संघातील ९६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत पंच म्हणून संजय पाटील सर , नितीन शिंगाने, अतुल बोरसे, एस पी . वाघ, प्रशांत वंजारी, प्रतीक बाविस्कर, मनोज चौधरी, अजय पाटील, गिरीश रौंदळे, कैलास बाविस्कर, जयेश सैदाणे,रेहान शेख , आशुतोष मगरे , मयुर खैरनार यांनी काम पाहिले.
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनात या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सहयोगी संस्था म्हणून नेहरू युवा मंडळ संस्थेने सहभाग नोंदवला होता. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे दिले जातील. यात ट्रॉफी. मेडल. प्रमाणपत्र या स्वरूपाची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत. या स्पर्धा तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या नेतृत्वात पार पडल्या.




