वैजापूर-लोक न्यूज
राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊ माँ साहेब या १६३३साली छत्रपती साडेतीन वर्षेचे लहान असताना काही दिवस वैजापूला वास्तव्य केल्याचे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक(ग्रामीण) सुनील लांजेवार यांनी शनिवार(ता,२८)रोजी प,स,सभागृहात आयोजित व्याख्यानात सांगितले ते पुढे म्हणाले की,
माँ जिजाऊ यांना वैजापुरला अटक केली होती, अटकेपूर्वीच त्यांनी लहान शिवबाला सुरक्षित स्थळी पाठवून दिले होते,जिजाऊंना वैजापूर-संगमनेर-जुन्नर ची जहांगीरी जिजाऊ यांच्याकडे त्या समयी होती,ते पुढे म्हणाले की ,तत्कालीन समाजातील सर्व धर्मीय लोकांना खूप जाचक त्रास होता, हा त्रास दूर व्हावा व सर्वांसाठी स्वराज्य व्हावे हे विचार जिजाऊनी शिवाजी महाराजांच्या मनात रजऊन सर्वांच्या कल्याणाचे राज्य जिजाऊंनी निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला, मता ना नावाच्या मुस्लिम कालावंतीला त्यांनी भरघोस अर्थ सहाय केले,भारताच्या इतिहासात माँ जिजाऊ आणि गौतमी या दोनच ऐतिहासिक माता आहेत ज्यांनी आपल्या मुलांच्या मनात स्वराज्य ज्योत प्रज्वलित केली,व सुराज्य निर्माण केले,शेतकऱ्यांच्या हिता साठी जगात पहिले पाऊल उचळणाऱ्या जिजाऊ च होय ,राजमाता जिजाऊंनी सर्वधर्मसमभावाचे राज्य निर्माण करून जगाला विश्वबंधुत्व ची जाणीव करून दिली, शिवाजी महाराजानी ज्या मोहीम फत्ते केल्या त्यात शंभर टक्के योजना जिजाऊंच्या होत्या असेही लांजेवार पुढे म्हणाले,
येथे नुकत्याच स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ- क्रांतीज्योती सावित्री- त्यागमूर्ती रमाई", प्रतिष्ठान ने हा व्याख्यान कार्यक्रम क्रांती ज्योती सावित्री बाई फुले,व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला,मिरवणूक काढणे,डी,जे,लावणे, व त्या समोर नाचणे यांने महापुरुष विचार समाजात जात नाही म्हणून व्याख्यान आयोजित करून महापुरुष विचार, त्यांचे कर्तृत्व तळा गाळा पर्यंत पोहचून देशाच्या तरुण वर्गाला व बाल, किशोर वर्गाला या महापुरुषाच्या कर्तृत्व ची जाणीव करून एक जबाबदार व कर्तव्य दक्ष समाज घडविण्यासाठी असे कार्यक्रम प्रतिष्ठान माध्यमातून सतत होत राहणार असे आपल्या प्रास्ताविकात प्रशांत पाटील सदाफळ यांनी व्यक्त केले,सुत्रसंचलन धोंडीराम सिंह राजपूत यांनी केले आभार बंटी मगर यांनी केले,कार्यक्रम अध्यक्ष संजय पाटील निकम होते, प्रतिष्ठानचे सर्वश्री बापू सोनवणे, साई मतसागर,प्रशांत त्रिभुवन, मोती वाघ,संजय बोरणारे यांनी कार्यक्रम घडवून आणण्यात पुढाकार घेतला, एकनाथ जाधव,मजीद कुरेशी,अखिल शेख,अल्ताफ बाबा,शांतीलाल पहाडे, ऍड,प्रतापराव निंबाळकर, सचिन वाणी, ज्ञानेश्वर टेके,धोरडे ,सुलभा भोपळे,सुनीता साखरे,पद्मा साळुंके, यांच्या सह शहरातील सर्व थरातील श्रोते उपस्थित होते, प्रतिष्ठान चा हा पहिलाच कार्यक्रम होता फार मोठा प्रतिसाद मिळाला.



