लोक न्यूज
अमळनेर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यानी अचानक तालुक्यातील सुंदरपट्टी येथील शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली असता ५० टक्केच विद्यार्थी उत्तर देऊ शकल्याने एक महिन्यात १०० टक्के गुणवत्ता न दिसल्यास कारवाई करण्याचा इशारा शिक्षकांना दिला आहे.
निपुण भारत अंतर्गत घेतलेल्या चाचणीच्या निष्पत्ती संदर्भात जिल्हाभरात जिल्हापरिषदेच्या शाळांवर पालक संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ,प्रगती ,आरोग्य याविषयी चर्चा करायची होती. खरोखर पालक मेळावे होतात की नाही ,पालकांना कळवले जाते की नाही याची खातरजमा करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना पर्यवेक्षणासाठी जबाबदारी देण्यात आली होती.
२२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया सुदरपट्टी जिप प्राथमिक शाळेत हजर झाले. शिक्षकांची एकच तारांबळ उडाली. पालक संपर्क मेळावा आटोपलेला होता. पालकांना दिलेल्या सूचना आणि पालक मेळाव्याची हजेरी पाहून डॉ आशिया यांनी सरळ पहिली ते सातवी असे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सुरू केले. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. सातवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना गुणकार ,भागाकार , तसेच इंग्रजी वाचन करायला सांगितले. फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन आणि उदाहरणे सोडविण्यात आल्याने अधिकारी संतापले. जिल्हा परिषद शाळेत गरिबांची मुले शिकतात. त्यांना घडवण्यासाठीच आपण पगार घेतो असे सांगून एका महिन्यात १०० टक्के गुणवत्ता दिसली पाहिजे. अन्यथा शिक्षकांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. तर गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांना सांगितले की विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख आदींनी जिप शाळांना भेटी वाढवा आणि फक्त भेटी देऊन चालणार नाही तर ग्रामीण भागातील मुलांची उपस्थिती आणि गुणवत्ता ,प्रगती वाढली पाहिजे अशा सूचनाही दिल्या. डॉ आशिया यांनी सात वर्गातील विद्यार्थ्यांशी तब्बल एक तास २० मिनिटे संवाद साधला. यावेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे हजर होते.
पालकांच्या प्रतिक्रिया....
काही ठिकाणी मुलांना न शिकवता मोबाईल मध्ये टाईमपास करत असतात...

