लोक न्यूज-
अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या जि.एस.हस्यस्कूल ची शैक्षणिक सहल ऐतिहासिक,प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळांना भेटी देऊन उत्साहात पार पडली.पाच दिवसांच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी कोकणातील समुद्रकिनारे,तेथील सौंदर्य यासह प्रेक्षणीय स्थळांवर सहलीचा आनंद लुटला.जि.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची कोकण भटकंती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली.
कोरोनाच्या दोन ते अडीच वर्षाच्या काळात सर्व जग ठप्प होत,शालेय उपक्रमातील तसेच मुलांच्या आनंदाचा एक भाग म्हणजे सहल.या देखील बंद झालेल्या.मात्र २०२२-२३ ला सहल निघावी अशी सर्वांची इच्छा होती.त्यानुसार शासनाच्या एस.टी.बसने कोकण भटकंती सहलीचे आयोजन करण्यात आले.शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांच्या मार्गदर्शन तथा परवानगीने जि.एस.हायस्कूल ची पाच दिवसांची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.
शैक्षणिक सहलीला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात ७७ विद्यार्थी व ८ शिक्षकांनी सहभाग नोंदविला. या पाच दिवसीय सहलीत रायगड,रत्नागिरी, तळकोकणातील सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.यात इमॅजिका वॉटर पार्क,अष्टविनायकापैकी एक पालीचा गणपती,महाड येथील चवदार तळे तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक,चिपळूण,परशुराम मंदिर,पावस येथील मठ,डेरवण ची शिवसृष्टी,संगमेश्वर,मार्लेश्वर,गणपतीपुळे, कनकेश्वर महादेव,मालवण, तारकल्ली येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा,सावंतवाडी,अंबाबाई तसेच महालक्ष्मी मंदिर,शाहू पॅलेस,ज्योतिबा मंदिर,आणि शेवटी शिर्डी असा प्रवास करत सहल अमळनेरात पोहीचली.यावेळी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळी ऐतिहासिक,भौगोलिक माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांचा आनंद पाहण्यासारखा होता.विद्यार्थ्यांनी संपूर्ण सहलीत धमाल केली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,सहल विभाग प्रमुख आर.जे.पाटील,आर.एन.साळुंखे, उपशिक्षक के.आर.बाविस्कर,ए.ए.पाटील,राहुल बहिरम, सी.आर.पाटील तसेच एन.जे.पाटील उपस्थित होते.सहल सुखरूप आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.



