अमळनेर - लोक न्यूज
लोण बुद्रुक ता. अमळनेर येथील ग्रामपंचायतीत श्री. पंकज नारायण पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतीत ठरल्याप्रमाणे श्रीमती. कल्पनाबाई नाना पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांज्या जागेवर पंकज पाटील उपसरपंच पदी बिनविरोध करण्यात आली. या निवड प्रसंगी लोकनियुक्त सरपंच कैलास भगवान पाटील माजी सरपंच खंडेराव चुडामण पाटील ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील, दीपक सर, नाना धनराज पाटील, प्रवीण पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे यांनी काम पाहीले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

