अमळनेर - लोक न्यूज
तालुका अमळनेर येथील शहापूर रस्त्याचे काम सुरु आहे. कळमसरे लगत सुरु असलेल्या कामात खडीकरणात पूर्णता माती मिश्रीत खडी वापरली जात असल्याने रस्त्याचे काम अगदी नित्कृष्ठ दर्जाचे सुरु असल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे.
कळमसरे गावापासून शहापूर रस्त्यावर कॉक्रीटीकरण सुरु आहे. येथील कामात ठेकेदाराने पूर्णता माती मिश्रीत खडी वापरल्याने रस्त्याचे पुन्हा तीन तेरा वाजणार असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु ठेकेदारांचे माणसांनी काम सुरूच ठेवले असून ठेकेदाराच्या मनमानी कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णता बंद झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णता निघाले होते. रस्त्यावर सर्वत्र खडी असून वाहन चालविणे शक्य नव्हते.तर पायी चालणे ही शक्य नाही एव्हडी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारक यांनी रस्ता बदलवून तांदळी, वासरे खेडी या रस्त्याने मार्ग शोधला होता. या रस्त्यावर गाडी बैल जाणेही शक्य नाही अशी परिस्थिती नाही त्यातच आता रस्त्याचे काम सुरु झाल्याने पुन्हा ठेकेदार या कामाचे निकृष्ठ काम करीत असल्याने ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केला असून कामाची सुधारणा न झाल्यास वरिष्ठ कार्यलायात याची तक्रार करण्यात येईल.
गावापासुन सुरु झालेले हे काम अंदाजे पाचशे मीटर असून याच दरम्यान कामाची प्रत खालावली असून याच रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरापासुन पुढे एक किलोमीटर अंतराचे डांबरिकरण करण्यात येणार आहे. याठीकाणी टाकण्यात आलेली खडी ही अगदी माती मिश्रीत टाकण्यात आली आहे. पुन्हा तीच समस्या या रस्त्याविषयी निर्माण होणार आहे.
गेल्या पंचवर्षिक वर्षात बऱ्याचदा या रस्त्याचे काम करा याविषयी लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र काही उपयोग झाला नाही. या पंचचवर्षिक काळात या रस्त्याचे काम सुरु असून मागील वर्षी उन्हाळ्यांत दोन किलोमीटर काम झाले आहे. यावर्षी एक किलोमीटर काम होणार असून तेही दर्जाहीन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे ---------
या रस्त्यावर सद्यस्थीतीत काम सुरु असून हा कळमसरे -शहापूर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून येथील संबंधीत अधिकारी यांनी लक्ष घालून चांगले काम करुण घ्यावे अशीही मागणी होत आहे.मात्र या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी सह अधिकार्याच्याही काना डोळा असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला असून याबाबत तिव्र संताप व्यक्त होत आहे.





