लोक न्यूज-
अनैतिक संबंधातून खून नरडाणा शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील साहेबराव उर्फ सायबु भिमराव मोरे व 42 याचा खून अनैतिक संबंधातून केला असल्याच्या गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना नरडाणा पोलिसांनी गजाआड केले आहे यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील अखिल पिंजारी याच्या मका या पिकाच्या शेतात एक अनोळखी इसमाचे प्रेत बांधून टाकलेले आहे अशी माहिती वालखेडा गावचे पोलीस पाटील सौ दिपाली वानखेडे यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला दिली पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनेच्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी एका पुरुष जातीच्या इसमाचे प्रेत प्लास्टिकच्या कागदात दोराने बांधून ठेवलेले आढळले गावकऱ्यांच्या सहाय्याने संबंधित मृतदेह हा वानखेड येथील साहेबराव भीमराव मोरे 42 याचे असल्याची खात्री झाली संबंधित घटनेची चौकशी सुरू केली असता सदरच्या शेतात शेतकरी म्हणून काम करणारा इसम मंगा उत्तम मोरे याने या घटनेची माहिती पोलिस पाटलांना दिली असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चौकशीसाठी मंगा मोरे यास पोलीस स्टेशनला पाचारण केले असता त्याच्या संशयास्पद वागण्याने बोलण्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला पोलिसांच्या चौकशीत मोरे याने साहेबराव भिमराव मोरे यांचा खून त्याचा मित्र चेतन बारकु मोरे यांच्या सहाय्याने केला असल्याचे निष्पन्न झाले यात मयत साहेबराव भिमराव मोरे याचे मंगा उत्तम मोरे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते त्यातूनच मंगळ उत्तम मोरे याने त्याचा मित्र चेतन बारकु मोरे यांच्या सहाय्याने साहेबराव मोरे याचा खून केला असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली यात चेतन बारकु मोरे यांनी स्वतःहून सोनगीर पोलीस स्टेशन येथे हजर राहून संबंधित गुन्ह्याची कबुली दिली यात दिनांक पाच मार्च रोजी साहेबराव मोरे यांना दारू पाजून पत्नीचा अनैतिक संबंधाचा काटा काढून खून केला असल्याचे कबूल केले असे पोलिसांनी म्हटले आहे मयत साहेबराव मोरे यांची आई विमलबाई भीमराव मोरे लेखी दिलेल्या फिर्यादीवरून भा द वि कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव विभागीय पोलीस उप अधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा येथील सपोनि मनोज ठाकरे पुढील तपास करीत आहेत.