लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील झाडी ते सबगव्हाण ह्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी अंदाजीत रक्कम पंधरा लक्ष मंजूर केली असून ह्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झालेआहे.आमदारांनी भूमिपूजन सोबत कामाची गुणवत्तेचीही दखल घेणे गरजेचे आहे.असा सूर जनते मधून उमटतांना दिसून आला. आज रोजी गावकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर यांना प्रत्येक्षात रस्त्याची पहाणी करण्यासाठी बोलविले.काही ठिकाणी रस्त्याच्या मध्ये भागी,साईड पट्टयाच्याठिकानी डांबर व खडी निघाल्याचे निदर्शनात आणून दिले.व त्यांनी मान्यही केले आम्ही हे काम दोन दिवसात पूर्ण करून सुरळीत करून देतो. असे आश्वासन गावकऱ्यांना दिले यावेळी उपस्थित मयुर पाटील,दिनेश पाटील,नितीन पाटील,विक्की पाटील,चतुर पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.