लोक न्यूज-

हास्य कवी सम्राट ऍड.अनंत खेडकर म्हणाले की लेखक व कवींना अनेक पुरस्कार मिळत असतात, मात्र या लेखक आणि कवींना जे व्यासपीठ देतात त्यांचाही गौरव महत्वाचा असल्याने हा नवीन पायंडा आम्ही पाडत आहोत, आतापर्यंत माझ्या अनेक कविता आणि लेखन होऊन शेकडो कार्यक्रम झाले असतांना प्रथमच माझ्या "असेच असते अंतरी" या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी विनोदभैय्या पाटील यांनी मोठे आर्थिक योगदान दिल्यामुळेच हे पुस्तक तयार होत आहे, त्यांनी खरोखरच माझ्यासारख्या  साहित्यिकास व्यासपीठ दिले म्हणून पुस्तक प्रकाशनपुर्व अनेक संस्थांनी त्यांची दखल घेऊन हे पुरस्कार दिले आहेत, याशिवाय या पुस्तकाचे रेखाटन अमळनेर येथील राजेश बारड यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले असल्याने त्यांनाही अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहिती खेळकर यांनी दिली. अतिशय मानाचे व उच्च दर्जाच्या संस्थाचे हे पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले.

      

पुस्तकाच्या निर्मितीसाठी विनोदभैय्या पाटील यांनी मोठे आर्थिक योगदान दिल्यामुळेच हे 34 पुरस्कार मिळालेत का? पुरस्कार मिळविण्यासाठी पुस्तक निर्मितीसाठी मोठे आर्थिक योगदान दिले गेले का? खेळकर यांनी हा सर्व खेळ घडवून दिला का?आशा जनते मधून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.