लोक न्यूज-
अमळनेर : तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण रामपुरी गोसावी व शहराध्यक्षपदी दिलीप राधामल सैनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळ ग्रह मंदिरात झाली. नूतन अध्यक्षपदी प्रवीण गोसावी व शहराध्यक्षपदी दिलीप सैनानी यांची नावे सुचवण्यात आली. सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. कोविड काळात दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर कोरोना रुग्णांना अन्न धान्य वाटप करणाऱ्या दुकांदाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेशन दुकानदारांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. नूतन अध्यक्षांचा सत्कार तहसीलदार मिलिंद वाघ व पुरवठा अधिकारी संतोष बावणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून भैय्या पाटील , भटू पाटील , युवराज पाटील , भगवान पाटील ,पंकज पाटील ,रामकृष्ण वाणी होते. बैठकीस दिलीप डेरे , सुनील वाणी ,जितेंद्र पाटील , प्रफुल जैन ,संजय चौधरी ,सुरेश चौधरी , भरत पाटील , बिपीन पाटील, रवींद्र पाटील , शांताराम पाटील ,छोटू पाटील ,राजाराम पाटील ,बंटी कामदार ,हारून मेवाती , प्रकाश मराठे , विजय पाटील , जगदीश पाटील हजर होते.