अमळनेर (लोक न्यूज ) होळीच्या निमित्ताने सर्व ठाकूर पुरुष,महिला,युवक युवती,लहान सहान अबाल वृद्ध एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीने होळी पूजन करण्यात येऊन आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला जमातीच्या प्रमुखांच्या हस्ते होळी पेटवून सालाबादप्रमाणे सुरवात करण्यात आली आहे.
येथील श्रीराम कॉलनी परिसरातील संत सखाराम महाराजांच्या शेतात वर्षानुवर्षे ठाकूर जमात बांधव होळी करीत असतात.ठाकूरांच्या च्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे होळीचा दांडा म्हणून उंबर झाडाची फांदी उभी करून त्यास पायाशी खोदलेल्या खड्ड्यात गवऱ्या ठेवून होळीसाठी कोरडे लाकडं लावली जातात.ओल्या झाडांची तोड न करता सामूहिक वर्गणीतून कोरडी लाकडं आणि गवऱ्या तसेच होळीचे पूजा,सजावट साहित्य सामाजिक वर्गणीतून गोळा केली जातात. होळीला रंगबिरंगी पताका,फुगे लावून महिला आणि पुरुषांनी सजविली. जमातीचे स्थानिक प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,प्रकाश वाघ,जितेंद्र ठाकूर,प्रकाश ठाकूर,संजय ठाकूर,गुणवंत वाघ,सरलाबाई ठाकूर,अनिल ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार हारडा हार कंगन अर्पण करून पूजन केले.होळीला उपस्थित समाज बांधवांनी विधिवत अग्नि देऊन होळी पेटवली. ‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात होळीला नवैद्य अर्पण करून होळीभोवती आंनदी वातावरणात फेर धरण्यात आला.
पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा शहरी वातावरणात जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून होत असते. याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली.रात्री उशिरापर्यंत होळीच्या अग्नीभोवती लोक आनंदात उत्साहात असतात.
याप्रसंगी हिराबाई ठाकूर,सौ जयश्री वाघ,सौ.शैलजा शिंदे,मंगला ठाकूर,हर्षदा ठाकूर,सौ.मंगला ठाकूर,देवका ठाकूर,सौ भारती ठाकूर,बेबीबाई ठाकूर,प्रिती ठाकूर,सौ.सरला जाधव,सौ.रेखा ठाकूर,मनिषा ठाकूर,हेमंत वानखेडे,विजय ठाकूर, उमेश ठाकूर,राजेंद्र ठाकूर,कल्पेश ठाकूर,वैभव ठाकूर,किरण सूर्यवंशी,संजय सूर्यवंशी,निलेश वाघ, सुरेश ठाकूर,उमाकांत ठाकूर,यशवंतराव सूर्यवंशी, जयवंतराव जाधव,सुरेश ठाकूर,गजानन ठाकूर,हिम्मत ठाकूर,अशोक पवार,काशिनाथ ठाकूर, विवेक सूर्यवंशी,प्रविण सोमा ठाकूर,सतिश ठाकूर,मुकेश ठाकूर,गणेश ठाकूर आदिंसह मोठ्यासंख्येने ठाकूर समाजाचे लोक उत्साहात उपस्थित होते.मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांनीही यावेळी होळीला भेट दिली.