लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील 2020-21 चे टिम बेसचे पैसे आशास्वयंम सेविका व अंगणवाडी सेविका यांना शासना मार्फत खात्या वरती जमा होत असतात पण काही माहाभाग अधिकारी ते पैसे आशा स्वयंम सेविकांनकडून गटप्रवर्तक यांच्या मार्फत मागणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांन कडे जमा केले जात असतात.ज्या आशा स्वयंसेविकानी पैसे देण्यास नकार दिला तर त्याच्या दप्तर तपासणी वेळी जाणून बुजून चुका काढल्या जातात आणि त्यांचा मानसिक छळ केला जातो. तसेच अमळनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविकाचे 2020-21चे टिम बेसचे पैसे त्यांच्या खत्यावर्ती न टाकता परस्पर मिलीभगत करून डल्ला मारल्याचे समजते. आरोग्य खात्यातील दादाच्या सांगण्यावरून सर्व काळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
लवकरच आरोग्य खात्यातील दादा जनतेच्या उजेळात येतील?