लोक न्यूज-

अमळनेर : ग्रामीण भागात प्रथमच तालुक्यातील मांडळ येथे भव्य २७ फुटी
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे महापूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ , पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील , सरपंच विद्या पाटील, डॉ सुनील चोरडिया , लोकमत चे जेष्ठ पत्रकार संजय पाटील , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील ,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील , अनंत निकम , भैरवी पलांडे , सुनील शिंपी , दत्तात्रय ठाकरे ,जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मांडळ येथील शिवशाही समिती च्या सहकार्याने पुतळा उभारण्यात आला असून सर्वत्र सजावट, रोषणाई करण्यात आली. सूत्रसंचालन किरण बडगुजर , अमित पाटील यांनी केले.