लोक न्यूज-
       करूणेचा भवसागर वात्सल्य सिंधु  कै. नर्मदा आजी यांचे आज ता.२८ रोजी प्रथम पुण्यस्मरण याविषयी घेतलेला आढावा ...........
             कळमसरे ता.अमळनेर येथील  कै. रामदास अवचित  महाजन यांच्या धर्मपत्नी कै. नर्मदा रामदास महाजन यांचे गेल्या वर्षी निधन झाले.आणि महाजन (सावंत)परिवार पोरका झाला. कै. नर्मदा आजीनी  आपले पती कै. रामदास आजोबाना खांद्याला खांदा लावून सर्व परिने साथ देत या परिवाराला मायेची ऊब दिली.आजीनी  आपल्या कर्तुत्वाने महाजन परिवाराच्या विकासात मोलाची साथ लाभली.  आजीला तीन पुत्र यात  संजय रामदास महाजन, ईश्वर रामदास महाजन, ज्ञानेश्वर  रामदास महाजन  यानीही उच्च शिक्षण घेत महाजन परिवाराच्या शिरपेचात तुरा रोवला. मोठा मुलगा संजय महाजन व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक आहेत.तर  ईश्वर महाजन हे तालुक्यातील देवगांव देवळी येथील माध्यमिक शाळेत उपशिक्षक  आहेत.आपल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करीत पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमानात आगळी वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. तर जळगाव जिल्हा ओबीसी मोर्चा संघटनेच्या माध्यमातून ते जिल्हाध्यक्षपदावर  काम पाहत आहेत.तर लहान मुलगा ज्ञानेश्वर महाजन यानीही एम ए पर्यन्त शिक्षण घेऊन गावात क्लासेस घेऊन ज्ञानार्जन् करीत आपल्या परिवारासोबत गावात वास्तव्य आहे. या तिन्ही मुलांनी आपल्या आईची सेवाव्रती सेवा देत  निरोप दिला. आज त्यांचे प्रथम पुण्यस्मण आजीनी दिलेल्या संस्कारावर  ते या  तिन्ही भावंडांनी महाजन (सावंत) परिवाराची    ओळख तर निर्माण केली त्यात मधले बंधु ईश्वर महाजन यांनी शिक्षण क्षेत्रात ,पत्रकारिता यात आपल्या गावासह तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
      कै. नर्मदा आजीनी हीच संपत्ती कमवलेली या परिवाराला आजीच्या संस्काराने पुढे नेईल. एवढे मात्र नक्की.........

आजीना भावपूर्ण श्रद्धांजली

शब्दांकन --प्रा.हिरालाल पाटील, पत्रकार