लोक न्यूज-
अमळनेर : शहरातील अतिसंवेदनशील भाग गांधलीपुरा आणि रेड लाईट एरिया असलेल्या गांधलीपुरा भागातील आधुनिक पोलीस चौकीचे उदघाटन पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
गांधलीपुरा भागात बहु समाज वस्ती वसलेली आहे. मजूर व गोर गरीब कामगार या ठिकाणी राहतात. तसेच चोरून लपून वेश्या व्यवसाय सुरू असतात. म्हणून या भागात बाहेर गावाहून लोक येत असतात. अनेक वेळा वाद उद्भवतात म्हणून या भागात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण पोलीस चौकीत ठेवण्यात आले असून जनतेच्या सुविधेसाठी व गोर गरिबांना न्याय देण्यासाठी आधुनिक पोलीस चौकी उभारण्यात आली. उदघाटन प्रसंगी डी वाय एस पी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक शत्रूघन पाटील, ,उद्योगपती सरजू गोकलाणी , माजी उपनागर्ध्यक्ष लालचंद सैनानी ,नगरसेवक सलीम शेख , नरेंद्र संदानशीव ,सलीम टोपी , नावेद शेख ,ज्ञानेश्वर धनगर , शब्बीर पहेलवान ,गुलाम नबी,जितेंद्र जैन ,हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर ,अमोल पाटील,निलेश मोरे आदी हजर होते.