लोक न्यूज-
अमळनेर : शहरात जुन्या सरकारी दवाखान्याजवळ कुंटणखाना चालवणाऱ्या दोन मालकीणींच्या इमारती उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी एका वर्षकरिता सीलबंद  करण्याचे आणि त्या इमारतीत भोगवटा करणाऱ्यांना निष्काषित करण्याचे आदेश दिले आहेत.
   जुन्या सरकारी दवाखान्याजवळ १० ऑक्टोबर २१ रोजी पोलिसांनी अजंता टॉकीज मागे तसेच जुन्या सरकारी दवाखाण्याजवळ जमीला बशीर व जुन्ना शेख अब्दुल या दोन महिलांच्या घरी छापे टाकले असता दोन्ही घरात चार चार पीडित महिला तसेच ग्राहक आढळून आले. या दोन्ही महिला आपल्या घराचा वापर कुंटणखाना चालवत असल्याचे आढळून आले. पीडित महिलांना महिला सुधारगृहात रवाना करून दोन्ही महिलांवर अनैतिक व्यवसाय चालवल्याबद्दल पिता ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन्ही महिलांची घरे सीलबंद करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. याबाबत सीमा अहिरे यांच्याकडे सुनावणी झाली. पोलिसांतर्फे तसेच दोन्ही मालकिणीकडून युक्तिवाद करून आपापले मुद्दे मांडण्यात आले. जुन्ना शेख यांनी एका मुलीचे बोनाफाईड व आधार कार्ड बाबत न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले , त्याच प्रमाणे हे क्षेत्र उच्च न्यायालयाने अनैतिक व्यवसायासाठी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केले असतानाही या भागात अनैतिक व्यवसाय केले म्हणून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दोन्ही मालकीणींच्या इमारती  सात दिवसात एका वर्षासाठी  सीलबंद करण्याचे तसेच भोगवटा धारकांना निष्काषित करण्याचे आदेश दिले आहेत.