लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्याने शिवलेले कपडे व बूट चप्पल असा साठ हजाराचा माल लंपास केल्याची घटना १४ रोजी रात्री घडली.
गणेश गबा माळी यांचे बसस्थानकाजवळ टेलर चे दुकान आहे. १५ रोजी सकाळी ते दुकानांवर आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले.त्यांच्या दुकानातील टांगलेले शिवलेले कपडे दिसून आले नाहीत. सुमारे ४५ हजाराचे कपडे चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षत आले. त्याचवळी शेजारील दुकानदार युवराज दगडू चांभार यांनी येऊन सांगितले की माझ्या दुकानाचे कुलूप सुद्धा तुटलेले आहे व दुकानातील १५ हजार रुपयांचे चप्पल ,बूट ,सँडल चोरीस गेले आहे. गणेश माळी यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोराविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.