लोक न्यूज-
राज्यातील आशा स्वयंसेविका  व गटप्रवर्तकांना प्रत्येकी अनुक्रमे २०००/- आणि ३००० रुपये राज्य शासनाने केलेल्या मानधनवाढीची एप्रिल २०२१ पासूनची थकीत रक्कम आणि जुलै २०२१ पासून केलेल्या मानधनवाढीची आणि कोविड भत्त्याची थकबाकी *दिवाळी पूर्वी मिळावी* . अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनाही भाऊबीज भेट अदा करावी, समान किमान कार्यक्रमांतर्गत जाहीर केलेली भरीव मानधनवाढीबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, कामानुसार मिळणाऱ्या मोबदल्यात भरीव वाढ करावी.
            यासह अन्य प्रलंबित मागण्यांवर आज आरोग्य *मंत्री मा. राजेशजी टोपे* यांच्या निवासस्थानी संघटनेच्या *अध्यक्षा मायाताई परमेश्वर* यांनी भेट घेत निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
         यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची मानधन वाढीसह सर्व थकीत रकमा दिवाळी पूर्वी अदा करण्याबाबत संबंधितांना आदेशित केले आहे तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शासन सकारात्मक विचार करत असल्याचे मा. मंत्री महोदयांनी सांगितले. 
         याप्रसंगी मायाताई परमेश्वर यांच्यासह संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील आणि सुधीर परमेश्वर उपस्थित होते.