लोक न्यूज- संतोष अहिरे,नंदुरबार

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बोंडआमळा गावातून ट्रकसह साडेपाच लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्याची करवाई वन विभागाच्या करण्यात आली.


नवापुर तालुक्यातील बोंडआमळा गावात एका ट्रकमध्ये अवैधरित्या ताज्या तोडीचा पंचरस जळाऊ लाकूड माल असल्याच्या गुप्त माहिती मिळाली. यावरून सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार व नवापुर वनविभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बोंडआमळा गावात जाऊन पाहणी केली असता संशयित वाहन (क्र. जीजे. 5 यू. 2650) ट्रकमध्ये अवैधरीत्या ताज्या तोडीचा लाकूड माल आढळून आला. वनविभागाचे कर्मचारी पोहोचताच सदरील वाहन चालक व लाकूड मालक फरार झाले. वनविभागाने लाकडाने भरलेला ट्रक मुद्देमालासह जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केला आहे.


माल कोणाचा तपास सुरू


वाहनात असलेल्या लाकडांची कत्तल कोणत्या ठिकाणाहून केली तसेच सदर माल कोणाचा आहे. याबाबत अधिक तपास वन विभागाचे कर्मचारी करत आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईत सदर वाहन व लाकूड मालाची अंदाजीत रक्कम साडेपाच लाख रुपयांची असल्याची माहिती वनविभागाने दिली. यासंदर्भात वनपाल वडकंळबी यांनी प्रथम गुन्हा नोंद करून पुढील कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग, शहादा सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार व वनक्षेत्रपाल नवापूर (प्रादेशिक) यांचे मार्गदर्शनाखाली रेंज स्टाफ नवापूर व चिंचपाडा करत आहे.