लोक न्यूज-
अमळनेर येथील व्यापारी संकुलात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अमळनेर येथील हशीमजी प्रेमजी संकुलात रात्री खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शहरातील जुना पारधी वाडा येथील रहिवासी असणाऱ्या प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी (वय ३५) या तरूणाची गळा चिरून हत्या झाल्याचे सकाळी सफाई कामगारांना आढळून आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृत तरूणाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. घटनेचे वृत्त कळताच एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
*पैशांच्या वादातून खून*--------
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून पैशांच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली. कैलास पांडुरंग शिंगाणे याने हे कृत्य केल्याचे आढळून आले. खून केल्यानंतर शिंगाणे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तथापि, पोलिसांनी त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले.त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांच्यावर पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे, पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव,पोलिस निरीक्षक जयपाल हिरे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राकेश परदेशी, हे तपास करीत आहेत.याकामी अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले.