संतोष अहिरे,नंदुरबार
लोक न्यूज-

राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध  शिथिल करण्यात आले. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांनी आदेश काडून नागरिकांना दिलासा दिला.
 नंदुरबार जिल्ह्यातील दुकानदाराने गेल्या दीड महिन्या पासून शासनाचे नियम पाळून काटेकोरपणे पालन केले. परंतु अवैध धंदे वाल्यांनी कुठलेही पालन न करता आपला धंदा सुरुच ठेवला.
नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर सट्टा मटका, अवैद्य प्रवाशी बस स्थानक नेहरू पुतळा परिसर, मंगल बाजार तसेच बँक ऑफ इंडिया शेजारी सट्टा मटका यांच्या धंदा तेजीत असून नंदुरबार शहराच्या गर्दीच्या ठिकाणी अवैध धंदे जोरात सुरू असूनही यांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावे अशी मागणी काही दिवसांपूर्वीच लोक प्रतिनिधींनी निवेदनात केली होती परंतु कुणीही दखल न घेता कुठलिही कारवाई झाली नाही, आता तरी नंदूरबार शहरातील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.