लोक न्यूज
अमळनेर : पोलिसांच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिचा विनयभंग करणाऱ्या टाकरखेड्याच्या तरुणाला अटक करून हिंदू मुस्लिम समाजात निर्माण होणारी तेढ  थांबवण्यात पोलिसांना यश आले आहे.
      अमळनेर शहरात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दामिनी पथक आणि डायल ११२ च्या कर्मचार्यांना सतर्क राहून त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाजी बगिच्यात एक मुस्लिम मुलगा अल्पवयीन मुलीला बळजबरी करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकम यांनी ११२ वरील कर्मचारी निलेश मोरे यांना पाठवून दोघांना पोलीस स्टेशनला आणले. ती मुलगी १७ वर्षाची  टाकरखेडा येथील असून सध्या सौंदाणे येथील रहिवासी आहे. तिची इन्स्ट्राग्राम वर मोहीम हुसेन पिंजारी याच्या सोबत चॅटिंग सुरू होती. ती मुलगी चार पाच दिवसांसाठी टाकरखेडा येथे आली होती. ती सौंदाणे येथे परत जाण्यासाठी निघाली असता मोहीम ने तिला अमळनेर बसस्टँड वर गाठून तुझे फोटो टाक , तू माझ्याशी लवशीप कर नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आणि तिला बळजबरीने शिवाजी गार्डन मध्ये घेऊन गेला व तिच्याशी अंगलट करीत होता. मुलगी लांब सरकत होती तर तो पुन्हा पुन्हा धमकी देऊन तिच्याशी अंगलट करीत होता. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर मुलीने आपबीती कथन केली. पोलीस निरीक्षक निकम यांनी मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेत मोहीम याच्याविरुद्ध तातडीने भारतीय न्यायासंहिता कलम ७५,७९ ,३५१(२) आणि पोस्को कायदा कलम ८ ,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत. 
    ऐन गणेशोत्सव आणि ईद सारख्या सणाच्या काळात अशा ब्लॅक मेल च्या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली असती. पोलिसांच्या तत्परतेने वेळीच नियंत्रण मिळवल्याने पोलिसांच्या भूमिकेचे समाजात कौतुक होत आहे.