लोक न्यूज
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकलिंसह एक लाख ६६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
    

२८ ऑगस्ट रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमजवळ दोन इसम पिस्टल विक्री व्यवसाय करीत आहेत. त्यावरून पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , मिलिंद सोनार ,उदय बोरसे , निलेश मोरे , विनोद संदानशिव यांच्या पथकाला पाठवले. तेव्हा पोलिसांना पाहताच दोन संशयित इसम पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले असता विशाल भैय्या सोनवणे वय १८ रा ढेकूसीम , गोपाल भीमा भिल  वय ३० या दोघांजवळ प्रत्येकी एक एक गावठी पिस्टल आणि प्रत्येकी तीन तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी दोघं तरुणांना लागलीच अटक केली तसेच  त्यांच्या जवळील मोटरसायकल क्रमांक एम एच ५४ ए ३५४ आणि बिना नंबरची मोटरसायकल असे एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघा आरोपींवर शस्र कायदा कलम ३,२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.