लोक न्यूज-
अमळनेर शहरातील मिळचाल भागात भागात सध्या आईकडे वास्तव्य करत असलेली, जळगावात राहत असताना कोरोनामुळे पती गेल्यावर निराधार झाल्याने सुवर्णा शिंपी ही दिव्यांग महिला संपूर्ण खचली होती. आज तिच्या घरी जाऊन रक्षाबंधन पार पडले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. लबडे यांनी या ताईकडून राखी बांधून घेऊन भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी डॉ. शरद पाटील, दर्शना पवार, प्रा सुनील पाटील, श्री नरेंद्र पाटील, निंभोरा येथील सरपंच पायल पाटील उपस्थित होते, सर्वांनी मिळून सुवर्णताई साठी साडी, मिठाई व आपापल्या परीने आर्थिक मदतही केली. हे सर्व अचानक घडल्याने ताई भारावून गेली.सामाजिक बांधिलकी आपल्या सोबत असल्याचे लक्षात आल्याने सुवर्णा शिंपी यांनी समाधान व्यक्त केले.