लोक न्यूज-
अमळनेर : शेतातील शेड मधून अज्ञात चोरट्याने ९० हजार रुपये किमतीच्या ३० शेळ्या चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात्री घडली.
    अक्षय गणेश पानसे रा मिळचाळ यांचे अमळनेर शिवारात शेत असून त्यांनी शेतात त्यांच्या सालदाराला झोपडी बांधून दिली असून बकऱ्यासाठी शेड बांधले आहे.४ रोजी शेतात काम करून रात्री ८ वाजता घरी गेले असता रात्री अज्ञात चोरट्याने ३० बकऱ्या चोरून नेल्या. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बापू साळुंखे करीत आहेत.