लोक न्यूज-
अमळनेर : नगरपरिषदेच्या सबओव्हर्सियर संजय पाटील यांच्या चौकशी कामी जिल्हाधिकारींनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली असून ३१ ऑगस्ट पर्यंत अहवाल मागवला आहे.
     संजय पाटील यांना अधिकार नसताना त्यांनी नगररचना अभियंता म्हणून सह्या केल्या , बांधकाम परवानग्या दिल्या, मोजमाप पुस्तिका , देयक , व्हाउचर यांच्यावर सह्या केल्या आहेत.रहिवास बांधकाम , वाणिज्य बांधकाम , भु अभिन्यास , तांत्रिक मान्यता देऊन मोजमाप पुस्तिकांवर सुद्धा सह्या केल्याची तक्रार जिल्हाधिकारीकडे करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकारींनी उपविभागीय अधिकारी - अध्यक्ष , नगरअभियंता चोपडा नगरपरिषद  व लेखापाल चोपडा नगरपरिषद - सदस्य  अशी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.