लोक न्यूज-
 प्रहार अपंग क्रांती संस्था तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर निधी वाटपाचे धोरण चुकल्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी केली असता आज तागायत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता तर सदरील आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे असे पत्र दिव्यांग कल्याण उपयुक्त सो.संजय कदम यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठवले व दि.२८ जून रोजी मागणी करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आदेश संबंधित अधिकारी /विभाग यांना देण्यात आले.
*मान्य करण्यात आलेल्या मागण्या*
१) शासन निर्णयानुसार दिव्यांगांना मनरेगा अंतर्गत काम उपलब्ध करून देणे.
२) शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे   ५% निधी दिव्यांगांसाठी उपलब्ध करून दिल्याने सादर निधी दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात यावा.सर्व प्रलंबित निधीचा पात्र लाभार्थींकरिता योग्य विनिमय ३० सप्टेंबर पूर्वी करावा.
३)संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थी यांचे प्रमाणपत्र काटेकोरपणे तपासण्यात यावे.तसेच ज्या प्रमानपत्राबाबत कोणतीही शंका उपस्थित झाल्यास शा.वै.म.जळगांव येथील दिव्यांग बोर्ड कडून संबंधित प्रमाणपत्राची खात्री करावी.बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारे लाभ देण्यात येणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी. तसेच अशी बोगस प्रकरणे असल्यास संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करावी.
४) दिव्यांगांसाठी घरकुल विषयक योजना असल्यास त्याची त्वरेने अंमलबजावणी व्हावी.
५)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संबधित दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID Card बद्दल अहवाल सादर करणे.
६) तालुका पातळीवर दिव्यांग बोर्ड सुरू करणे बाबत पाठपुरावा करणे.
७)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव दिव्यांग बोर्ड चे सुसूत्रीकरण करणे. पात्र दिव्यांग लाभार्थींना सर्व सुविधा पुरविणे. पात्र प्रमाणपत्र धारक मयत झालेले असल्यास नोंद घेणे. व पात्र दिव्यांगांची यादी अद्ययावत ठेवणे.
८) संजय गांधी योजना समितीमध्ये शासन निर्णयाच्या अधीन राहून दिव्यांग प्रतिनिधी यांना सामील करणेबाबत कार्यवाही करावी.
९)दिव्यांग हक्क व संरक्षण कायदा २०१६ चे कलम ८९,९२,९३ च्या अनुषंगाने दिव्यांगांसाठी कार्यशाळा घेणे.
१०) दिव्यांग निधी व अन्य बाबींच्या अनुषंगाने अमळनेर नगरपालिके बद्दल प्राप्त तक्रारी विषयी अहवाल सादर करणे.
११) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिव्यांगांच्या मागण्या /अडचणी याबाबत प्राप्त होणार अर्ज , निवेदन यांच्या अनुषंगाने संबधित विभागांना वेळोवेळी अवगत करणे व पाठपुरावा करणे.

वरील प्रमाणे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्या मान्य करून
उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.पं जळगाव, आयुक्त जळगांव शहर महानगरपालिका, गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व, मुख्याधिकारी नगरपालिका सर्व, तहसीलदार (सं. गां.यो) जि. का.जळगांव, तहसीलदार (सर्व) अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव, जिल्हा शल्य चिकित्सक जळगांव, पोलीस अधीक्षक जळगांव, मुख्याधिकारी नगरपालिका अमळनेर, तहसीलदार सर्वसाधारण यांना सदरील मागणी केल्याचे आदेश देऊन मागण्या मान्य झाल्याचे माहिती प्रहार संघटनेत कळवण्यात आली आहे.