लोक न्यूज- महेंद्र गुरव तळोदा
तळोदा येथील रहिवासी स्मित हॉस्पीटल(नंदुरबार )चे डॉ गौरव तांबोळी यांनी जिल्ह्यात रुग्णांना कोविड काळात चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा दिल्याने डॉ. गौरव अशोक तांबोळी यांचा मा.राज्यपाल
श्री भगतसिंह कोशारी व महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री मा. नामदार राजेशजी टोपे यांच्या हस्ते सन्मानित केले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
हि बाब आपला समाज व तळोदेकरांसाठी अभिमानस्पद आहे. व आपण तांबोळी समाजाचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या कार्याचा सन्मान म्हणून तळोदा तांबोळी - बारी समाजाच्या वतीने *डॉ. गौरव अशोक तांबोळी* यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक १२/०८/२०२१ श्री दत्त मंदिर मेनरोड येथे करण्यात आला.
यावेळी डॉ. गौरव अशोक तांबोळी याचा सत्कार तळोदा तांबोळी बारी समाज अध्यक्ष श्री बंन्सिलाल तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. गौरव यांचे दादा श्री रणछोड तांबोळी यांचा सत्कार श्री बाबुलाल तांबोळी यांनी तर डॉ. गौरव यांचे वडील श्री अशोक तांबोळी सर यांचा सत्कार श्री शरद तांबोळी यांनी केले. समाजातील सर्व समाज बांधव व महिला तसेच तरुणांनी ही सत्कार केला. यावेळी *डॉ. गौरव* यांनी कोविड 19 व लसीकरणा विषयी मार्गदर्शन केले. व करोना पेशंट नसले तरी मास्कचा वापर व नियम पाळण्याचे आव्हान त्यानी केले. तरी सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होते.