लोक न्यूज-
आज ९ आगस्ट विश्र्व आदिवासी दिवस म्हणुन पूर्ण जगात मोठ्या उत्साहाने सण म्हणून साजरा करण्यात येतो पण या वर्षी कोरोना सारख्या महामारी मुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ९ आगस्ट हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासींचे प्रश्न लक्षात घेऊन व आदिवासी हा खर्या अर्थाने साकृतीचे जतन करणारा आहे . जल जंगल जमीन वर त्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे त्याचा एक दिवस असावा म्हणून ९ आगस्ट दिवस हा आम्हाला मिळाला. परंतु आदिवासींचे प्रश्न काही मार्गी लागण्याचे नाव घेत नाही.तरी या विश्र्व आदिवासी दिवस निमित्त प्रशासन व प्रशासक यांनी आदिवासींचे प्रश्न लक्षात घेऊन मार्गी लावण्यात यावे..