लोक न्यूज-
26 जानेवारी 15 ऑगस्ट व आपल्या कलाकुसर रांगोळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून समाजाला अनेक संदेश देणाऱ्या रांगोळीकाराला मिळाला राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 या भव्य उपक्रमात राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार 2020 अमळनेरचे सुप्रसिद्ध रांगोळीकार नितीन मुरलीधर भदाणे यांना सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीशील म्हणून गौरवण्यात आले
संस्थेचे संस्थापक ऍड कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रदान करण्यात आला पुरस्काराचे वितरण लोकडाउनमुळे व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आले होत्र मात्र भदाणे यांना ऑनलाईन मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याहस्ते व लाडशाखीय वाणी पंच मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कलाकार हा शेवटपर्यंत शिकत असतो आणि त्याच ही काही समाजाला देणं लागत म्हणूनच गेल्या 14 वर्षांपासून या क्षेत्रात ह्या कलेला साकारत असताना समाजप्रबोधनाच्या विषयांवर नितीन भदाणे यांनी अनेक कलाकुसर रांगोळी व भारतातील प्रथम रांगोळी मधून रामायण दाखवण्यात त्यांनी सांगितले
त्यांची अमीर खान, शरद पवार, अण्णासाहेब हजारे, आदित्य ठाकरे सिंधुताई सपकाळ यांच्या सह अनेक दिग्गज मान्यवरानी कौतुकाची पाठ थोपटवली आहे.