लोक न्यूज- नरडाणा
ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोघेही जागीच ठार नरडाणा शिरपूरहुन धुळ्याकडे जाताना ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा ट्रक मधील मागच्या चाकात येऊन करुण अंत झाला तर ट्रक चालक फरार असून ट्रकला नरडाणा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील रुदावली येथे आपल्या काकांची अंतयात्रा पूर्ण करून रविंद्र पांडुरंग पाटील 45 व त्यांची पत्नी भटाबाई रवींद्र पाटील 40 रा नगाव ता जि धुळे हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 18 ए एच 85 92 ने आपल्या गावी नगाव येथे निघाले रस्त्यात गावातील गजानन बैसाणे 35 रा नगाव ता जि धुळे भेटले त्यांच्या हातात दुचाकी देऊन दोघेही नवरा बायको दुचाकीच्या मागे बसलेत धुळ्याकडे जाताना कमखेडा फाट्यावर मागून भरधाव वेगाने येत असलेला ट्रक क्रमांक एम.पी. 09 एच एच 0228 याने यांच्या दुचाकीला मागून जोराने धडक दिल्याने दुचाकीवर सगळ्यात मागे बसलेल्या भटा बाई रवींद्र पाटील या रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्यात तर गजानन बैसाणे व रवींद्र पाटील हे ट्रकच्या चाकात येऊन जागीच गतप्राण झाले यानंतर ट्रक चालकाने गाडी नरडाणा जवळील महामार्गाच्या कडेला लावून चालक मात्र फरार झाला यानंतर मृत झालेल्या दोघांना शवविच्छेदनासाठी नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले यातील मृत रवींद्र पाटील हा बांधकाम मजूर असून त्याच्या पश्चात आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे तर दुसरी मृत व्यक्ती गजानन बैसाणे हा गाडी ड्रायव्हर आहे त्याच्या पश्चात पत्नी आई व दोन मुले असा परिवार आहे यासंदर्भात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम नरडाणा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते सपोनि मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद पाटील हे पुढील तपास करीत आहेत.