लोक न्यूज-
भडणे,तालुका शिंदखेडा येथील जगदीश चौधरी या विद्यार्थ्याला,धुळे शिंदखेडा बस मध्ये दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बस च्या सीट खाली महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग सापडली, सदर बॅगेत यांची महत्त्वाची कागदपत्रे, होते त्या व्यक्तीची शोधाशोध केली असता,मालेगाव,महानगरपालिकेत सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक राजेंद्र देसले यांच्याशी संपर्क झाला ते शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील महेंद्र पवार यांच्याकडे काही कामानिमित्त आले असता त्यांच्या धुळे बस मध्ये पाकीट व कागदपत्रांची ब्याग हरवल्याचे निष्पन्न झाले , यातमाध्यमिक शिक्षक यांची महत्त्वाची कागदपत्र पॅन कार्ड आधार कार्ड तिन एटीएम कार्ड गाडीचे लायसन असे महत्वाचे कागदपत्र होते भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले, माजी उपसरपंच संजय चौधरी ग्रामपंचायत सदस्य भाऊ साहेब निकम माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष देसले रमेश,पाटील धनराज देसले , मुकेश देसले,संग्राम राजपूत योगेश गिरासे भडणे,पोलीस पाटील युवराज माळी पाटन येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवारआदी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सदर कागदपत्र ग्रामस्थांच्या उपस्थित,प्ररत करण्यात आली.