लोक न्यूज-
पारनेरच्या तहसीलदार मा.श्रीमती ज्योतिताई देवरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची व प्रशासनाच्या पदाचा दुरुउपयोग करून बेकायदेशीर कामांची चौकशी करून  गैर व्यवहाराची निःपक्षपाती चौकशी करण्यासाठी

त्यांना निलंबित करून त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करून निलंबन करणेबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक तसेच जेष्ठ पत्रकार अरुण आंधळे पाटील  दि.२७ जुलै पासून विभागीय आयुक्त कार्यालय  नाशिक येथे बेमुदत उपोषनास बसले होते ,  दि.२२ जुलै रोजी मा विभागीय आयुक नाशिक यांना नाशिक येथे ४९२  पानांचे भ्रष्टाचार चा व पदाचा दुरुपयोग कसा केला गेला याचे पुरावे  अरुण आंधळे पाटील यांनी सद्दर केले हे पुरावे पाहून आम्ही जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चौकशी साठी कमेटी नेमून चौकशी करण्यात यावी असे आदेश देतो असे आम्हाला सांगितले, पण सात दिवसात दिवसात चौकशी होईलकी नाही याबाबत आम्हाला शंका आल्याने आम्ही दि. २७ जुलै पासून

विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत उपोषणास बसलो, व घडलेही तसेच आज २ ऑक्टोबर म्हणजे ७ दिवस उलटले तरी अहवाल प्राप्त झाला नाही।                                                          

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश  संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक श्री अरुण आंधळे पाटील व निवृत्ती कासुटे हे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक येथे दि.२७  जुलै पासून उपोषणास बसले होणे 

पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योतिताई देवरे यांनी पारनेर तालुक्यात खूप मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला असून अनेक आदेश खोट्या कागदपत्राचे आधारे चुकूचे आदेश दिले आहेत 

या बाबत प्रांत पारनेर - श्रीगोंदा तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अनेक तक्रारी अर्ज दिले,तसेच या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी दि.१३ जुलै २०२१ रोजी१दिवशीय लक्षवेधी उपोषणही केले परंतु संबंधित अधिकारी यांनी या उपोषणा कडे लक्ष दिले नाही 

या साठी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपोषण करून न्याय मागण्याची वेळ आली, या भ्रष्टाचाराची निःपक्षपने चौकशी व्हावी यासाठी तहसीलदार पारनेर यांना निलंबित करावे किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावे ही उपोषण कर्त्याची मुख्य मागणी आहे पण विभागीय आयुक्त नाशिक यांनी जिल्हाधिकारी नगर व प्रांत पारनेर - श्रीगोंदा यांचे कडेच तपासाची  सूत्रे सोपविली आहेत 

   

     जवळपास ५०० पानांचे पुरावे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब यांना दिले आहेत ,  त्यात  तालुक्यातील बिनशेती आदेश ,जे बनावट कागदपत्रे तयार करून व अधिकार नसताना दिले आहे, कोरोना सेंटर मधील गैर व्यवहार, वाळू तस्करीच्या १५० बिन नंबरच्या ट्रक मधून पुणे,नगर येथे वाळू तस्करी,वाळू चोरीच्या गाड्या पकडल्या रजीस्टर मध्ये नोंद केली पण पावती न फाडता व  शासनाच्या  तिजोरीत वसूल केलेला दंड स्वतः ठेऊन गाड्या सोडण्यात



आल्या,कोरोना काळात शासकीय जागेत ब्लॅकमेकर, विनयभंग व इतर गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुंडाचा वाढदिवस साजरा केला तसेंच ९० ते १०० लोकांना मटन बिर्याणीचे जेवण दिले,

तसेच कान्हूर पठार पतसंस्थेत ४० ते ५० लोकांनी त्यांचा व त्या ब्लॅकमेकर पत्रकाराचा सत्कार केला.
कोणीही मास्क घातला नव्हता अगदी गर्दीत सत्कार समारंभ पार पडला. व पारनेर तालुका जिल्यात नंबर १ वर आहे पण जिल्हाधिकारी अहमदनगर व प्रांत पारनेर या बाबत कोणतीही कारवाई करत नाहीत,त्या मुळे अनेक गंभीर गुन्हे असूनही तहसीलदार पारनेर यांना अभय देण्याचे  काम होताना दिसत आहे व याला कारणीभूत वाळू तस्करीचा करोडोंचा हप्ता असण्याची शक्यता आहे. नुकतेच टाकळी  ढोकेश्वर  च्या घाटात

                     पत्रकार


संपदा साळवे ही पत्रकार असलेली युवती आपल्या वाडीलांसमवेत  कान्हूर कडे चालली होती  तिला मुळा नदीकडे वाळू भरण्यास चाललेल्या मोकळ्या हायवा ट्रकने धडक दिली ती धडक अशी होती की पुडून घुसलेली स्कुटर थेट मागच्या दोनी चाकांच्या मध्ये अडकली, पण पारनेरच्या जनतेला हे अपघात


नेहमीचेच झाले आहेत, वाळू तस्कर काही पैसे देतात मृत व्यक्तीचा लिलाव होतो व प्रकरण दाबले जाते , या वाळूच्या  ट्रकने अनेक जणांना चिरडले पण कारवाई नाही पारनेर कर कान, डोळे,नाक बंद करून गांधीजींची माकडे बनले आहेत ,समाजसेवक झोपले आहेत पण आता आम्ही या भ्रष्टाचार विरोधात आवाज

उठविण्याची  शपथ घेतली आहे आज संपदा साळवे ही पत्रकार चिरडली उद्या तुमची मुलगी,मुलगा चिरडले जातील तेव्हाही तुमच्या बरोबर कोणी नसेल या साठी

आम्ही हे आंदोलन छेडले आहे मी एकटा निघालो आहे आले तर तुमच्या सह नाहीतर तुमच्या शिवाय ही लढाई मी ६१ व्या वर्षी सुरू केली आहे, आता माघार नाही जे कोणी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतील मग ते कोणीही असोत , राजकारणी असोत, ब्लॅकमेकर व लाचार पत्रकार असोत ,मंत्री असोत  की शासकीय
अधिकारी असोत  आता या असे सामन्याला...  असोत आज नाशिकचे मा स्थायी समिती सभापती व सातपूर

शिवाजी नगरचे नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील उपोषण स्थळी आले  व त्यांनी आमची धाडळलेली तब्येत पहिली व त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली.सर्व प्रकरण त्याना सांगितले .नाशिक रोड पोलीस रोज बिटको येथील मनपा दवाखान्यात  मेडिकल चेकअप साठी नेत पण त्या ठिकाणी

उपोषणकर्त्याऱ्यांना एखाद्या आरोपी सारखे वागविले जाते, त्या ठिकाणच्या महिला डॉक्टर पेशंटकडे फिरकत नाही सर्व आजारावर फक्त क्रोशीन गोळी दिली जाते, या मुख्य डॉक्टर अक्षरशः या दवाखान्याच्या मालकीण बनल्या आहेत,रुग्ण उपचारा अभावी तडफडून मरताना आम्ही येथे पाहिले नाशिक रोड पोलिसही एखाद्या

नामचीन गुंडा प्रमाणे उपोषणास बसलेल्या  जेष्ठ समाज सेवकांना  पिंजऱ्याच्या गाडीत मेडिकल साठी नेतात  हेच काय स्वतंत्र,हीच काय लोकशाही उपोषणास बसणारा जणू काही देशद्रोही, नामचिन गुंड, हे आम्ही नाशिक व अहमदनगर यर्थे अनुभवले, त्या मुळे खूप त्रास झाला पण आता माघार नाहि,

आज सायंकाळी ६ वाजता मा.विभागीय आयुक राधाकृष्ण गमे,उपायुक्त महसूल नाशिक विभाग नाशिक श्री गोरक्ष गाडीलकर यांचेशी चर्चा झाली व त्यांनी कोरोना तसेच या भ्रष्टाचारात बरेच विभागात चौकधी होत असल्याने व त्यासाठी कमिटी नेमली असल्याचे व आज पडून  ७ दिवसात चौकशी करून  त्या नुसार पुढील कारवाई करण्याचे लेखी पत्र  उपायुक्त महसूल नाशिक विभाग श्री गोरक्ष गाडीलकर यांनी जेष्ठ समाजसेवक अरुण आंधळे पाटील यांना दिले आहे

त्यांचे तहसीलदार यांनी सदर पत्र अरुण आंधळे पाटील यांना दिले व उपोषण स्थगित करण्यात आले, या प्रसंगी  मा .तहसीलदार, नाशिकचे जेष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील,समाजसेविका भावना पवार - हगवणे, पप्पू,कासुटे व इतर अनेक मान्यवर हजर होते, कोरोना मूळे गर्दी जमविण्यासाठी बंदी असल्याने मोजक्या

मान्यवरांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश  चे प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक व जेष्ठ पत्रकार श्री अरुण आंधळे पाटील व पप्पू कासुटे यांनी हे उपोषण स्थगित केले पण ७  दिवसात अहवाल येऊन कारवाई न झाल्यास संस्थेतर्फे मुंबईतील आझाद मैदान येथे पुन्हा १५ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू होईल,या उपोषणाकडे संपूर्ण पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे संपूर्ण तालुक्यातील भ्रष्टाचारी  तहसीलदार विरोधात मी एकटा लढाईस उतरलो आहे ,  पारनेर करांनो तुम्ही घाबरता,सारे गुपचूप भ्रष्टाचार पाहतात म्हणून असे भ्रस्ट अधिकारी मुजोर बनतात

असो.... जे येतील त्यांचा सह व जे न येतील त्यांच्या शिवाय ही लढाई मी माझ्या तालुक्यासाठी लढणार आहे ... आता उर्वरित आयुष्य माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या तालुक्यासाठी ...

दुसरे अत्यंत महत्वाचे मला विकत घेणारे, तसेच हे उपोषण व हे आंदोलन मागे घेण्यासाठी जे जे दलाल,माझ्याकडे प्रयत्न करत होते त्यानांही समजले असतील मी काही लाखासाठी विकला जाणारा नाही  कारण मी या पुढे जनतेकडे भीक मागून आंदोलन लढणार आहे  ...... 

आमचे जेष्ठ बंधुतुल्य व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब कांबळे यांनी मला तसे आदेश दिलेले आहेत ।  प्रेमाने दिलेला १ रुपया भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या लाखो रुपया पेक्षा श्रेष्ठ आहे .!! उद्या पासून सर्व महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू होणार होते पण तूर्त 15 ऑगस्ट पर्यन्त वाट पाहू ,  संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती उद्याचे आंदोलन थांबवावे धन्यवाद !

आपली साथ असू दया !! 

तुम्ही फक्त लढ म्हणा । फक्त सत्यासाठी

अरुण आंधळे पाटील

प्रदेश उपाध्यक्ष

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश