लोक न्यूज


अमळनेर : येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड,दिल्ली(सी बी एस इ) च्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील एक नावाजलेली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी सी बी एस ई दिल्ली मार्फत मान्यता प्राप्त असलेली ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल ही नावलौकिक मिळवलेली शाळा आहे. शाळेतील सर्व आधुनिक सुविधा व गुरुजनांचे मौलिक मार्गदर्शन या आधारावर विद्यार्थ्यांनी 100 टक्के यश संपादन केले आहे. यामध्ये प्रेरणा लहू पाटील 93.60 टक्के , जान्हवी धनंजय पाटील 93.40 टक्के ,सानिका शरद पावर 88.40 टक्के,वरदराज विवेकानंद पाटील 85.20 टक्के व वैष्णवी प्रकाश पाटील 84.20 टक्के, सदर विद्यार्थ्यांचा प्रथम पाच क्रमांकात समावेश आहे व उर्वरित सर्व विद्यार्थी हे 82 टक्के च्या वर मार्क्स मिळवुन उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा.शाम पाटील, संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी तसेच सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.