लोक न्यूज-
झाडी येथील मयुर पाटील व ग्रामस्थांनी उपविभागीय जि.प अभियंता बांधकाम उपविभाग अमळनेर यांना मौजे झाडी ते शिरसाळे झाडी ते ढेकू या मार्गावरील झाडे तोडणे व गटारीची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले

          झाडे येथील गावकरी त्या रस्त्याचा वापर करीत असल्याने समोरून येणारी छोटी वाहने व अवजड वाहनांची नेहमी ये जा होत असल्याने व काटेरी झुडुपे दिशादर्शक चिन्हे नसल्याकारणाने दोन वाहनांमध्ये अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे...
           तरीही ही होणारी ग्रामस्थांची गैरसोय दूर व्हावी व त्या मार्गाच्या गटारी तुडुंब भरल्या कारणाने गटारीचे पाणी घाण रस्त्यावर येते पावसाच्या पाण्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे या समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी झाडी येथील मयुर प्रविण पाटील यांनी केलेली आहे....

           सदर निवेदनावर मयुर पाटील दिनेश पाटील योगेश पाटील हर्षल पाटील किरण पाटील रणजीत पाटील गोपाल पाटील जोगल पाटील भावेश पाटील आश्रम पाटील राकेश पाटील विकास पाटील संजय पाटील पाटील नितीन पाटील आदींच्या सह्या आहेत..