अमळनेर-लोक न्यूज

अमळनेर येथील दानशूर प्रा.रा.का.केले कुटूंबाकडून बी.फार्मसी कॉलेजसाठी 25 लाखांची देणगी
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळामध्ये विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. संस्थेतर्गत आजपावेतो एकही
व्यावसायिक पदवीचे अभ्यासक्रम सुरू नव्हते. अलीकडे संस्थेला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसीटी (DBATU) लोनेरे, रायगड, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचनालय (DTE, मुंबई) द्वारे नुकतीच मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच बी.फार्मसीच्या स्वरूपात तांत्रिक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाला मान्यता प्राप्त झाली आहे. बी.फार्मसी अभ्यासक्रमासाठी एकूण प्रवेश क्षमता 60 विद्यार्थ्यांची असेल.
त्यासाठी लवकरच शासनामार्फत निर्देश मिळाल्यानंतर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. सदरअभ्यासक्रमासाठी वार्षिक शुल्क रू.70,000/- राहील.प्रस्तुत औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमाला “प्रा.रा.का.केले कॉलेज ऑफ बी.फार्मसी” असे नामकरण
देण्यात येणार असून त्यासाठी अमळनेर येथील दानशूर व्यक्तिमत्व श्रीमती रजनीताई केले यांनी रू.25 लाखांची देणगी
घोषित केली असून लवकरच ते सदर देणगीची रक्कम संस्थेला सुपूर्द करणार आहेत.
बी.फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध
होणार आहे :1) उच्च शिक्षणात एम.फार्मसी व पीएच.डी.साठी संधी,
2) नॅशनल व मल्टीनॅशनल फार्मास्युटीकल कंपनीत विविध विभाग जसे Production, Quality Control, Packaging,
Marketing मध्ये संधी,
रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून शासनाच्या सर्व हॉस्पिटल मध्ये संधी,
4) शासनाच्या UPSC/MPSC परीक्षा देवून Central Drug Inspector/State Drug Inspector & Food Inspector
म्हणून संधी,
5) NIPER सारख्या नॅशनल संशोधन संस्थेत संधी.
सदर अभ्यासक्रमासाठी सुसज्ज अशी सर्व सोयींनीयुक्त इमारतीची निर्मिती कार्य गतीशील असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी
उपलब्ध करून देण्याचा मानस कार्यकारी मंडळाचा आहे. सदर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्षश्री.जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष-श्री.कल्याण पाटील, कॉलेज ऑफ फार्मसीचे चेअरमन-सी.ए. नीरज अग्रवाल, संचालक
डॉ.बी.एस.पाटील, श्री.हरि भिका वाणी, डॉ.संदेश गुजराथी, श्री.योगेश मुंदडे, श्री.प्रदीप अग्रवाल, चिटणीस डॉ.ए.बी.जैन,
डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.रविंद्र माळी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहे.