लोक न्यूज-

शेतीवरील कालबाह्य नोंदी, बोजे कमी करण्याचे आयुक्त गमे यांचे आदेश..

आज रोजी अमळनेर तालुक्यात162 सात बारा उतारे झाले कोरे..

आयुक्तांनी काढलेले आदेशाचे शेतकऱ्यांनी केले स्वागत..

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,सर्कल,तलाठी यांचे मोठे योगदान...

शासनाने आदेश काढले आहेत शासन आपल्या स्तरावर चोखंदळ काम करणारच आहे असेही जनते मधून मत व्यक्त होत आहे.

उगाच प्रसिध्दीसाठी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करू नये असे हि मत जनते मधून व्यक्त होत आहे

दि.6-8-2021रोजीच्या आदेशात म्हटले आहेकी;
  शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर असलेले बोजे, कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवहार करणे सोपे होणार आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर तहसीलदार व तलाठी यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी आणि कॅम्प, मेळावे घेऊन मार्गदर्शन करावे, असे आयुक्त गमे यांनी आदेशात म्हटले होते.

जळगावसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रदीर्घ काळापासून तगाई, बंडिंग, सावकारी बोझे, रद्द झालेल्या भूसंपदनाच्या नोंदी, आयटक बोझे, अस्तित्वात नसलेल्या संस्था व सोसायट्यांचे बोझे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी खरेदी विक्री, कर्ज प्रकरण, भूसंपादन मोबदल्याच्या कामकाजात अडचणी येत होत्या. तसेच शासनाकडून शेती सुधारणासाठी विहीर, तगाई, बैल तगाई, चारा तगाई, खावटी तगाई, ऑइल इंजिन तगाई, बी-बियाणे तगाई परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिले होते. त्याची नोंद शेतकऱ्यांचा सात बारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंदवली होती. मात्र शासनाने तगाई विषयक कर्ज माफ केले आहे. तरीही बोझे दिसत असल्याने तलाठ्यांनी ते कमी करावेत. पूर्वीच्या काळी सावकारी कर्ज घेतले जात होते. त्याचे हप्ते फेडूनही नजर गहाण नोंदी नोंदवल्या आहेत. अनेक संस्था बंद झाल्या आहेत, तरी त्यांचेही बोझे शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर दिसत आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ते कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना द्यावेत असे आदेशात म्हटले आहे.