अमळनेर-लोक न्यूज
मारवड ता.अमळनेर येथील आंनदराव माधवराव कोळी यांच्याकडे असलेली गावठी दारू पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार छापा टाकून दोन हजार किमतीची दारू पकडण्यात आली.यावेळी अजुन काही ठिकाणी दारू असल्याचेही खबर होती मात्र दिलेल्या माहितीनुसार काहीही मिळाली नाही.मात्र दोन हजार किमतीची दारू सापडल्याने आनंदराव कोळी यांच्यावर मारवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांनी गुन्हा दाखल केला .