अमळनेर-लोक न्यूज

निंभोरा ता.अमळनेर येथील एका युवकास लोखंडी रॉड ने मारहाण करुण जखमी केल्याने मारवड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
     सविस्तर वृत्त असे की, येथील आश्विनी खुशाल पारधी यांनी आंतरजातीय विवाह केल्याने  येथील गावातील  नितिन शेखर पाटील ,हेमंत शेखर पाटील यांनी आश्विनी हिला तु आदिवासी समाजाचा मुलाशी का विवाह केला.  असे दोन दिवसांपूर्वी बोलले होते.मात्र आज ता.8 रोजी तिचे पती खुशाल राजेंद्र पारधी यास अचानक पणे येऊन लोखंडी रॉड ने मारहाण करुण त्याठिकानाहुन पळ काढला .आश्विनी पारधी यांच्या सांगण्यावरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार किशोर पाटील हे करीत आहे.