गौरवकुमार पाटील | अमळनेर
(लोक न्यूज)

दरोड्यांसाठी वापरले जाणाऱ्या साहित्यासह चार जणांना रंगेहाथ पकडले असून त्यातील एक फरार झाला आहे , त्याच्या जवळील १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल व कार पोलिसांनी जप्त केली असून चारही आरोपींना अटक करून मारवड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मारवड पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंग दरम्यान आज दिनांक २ रोजी पहाटे २:३० ते ३ च्या वाजता पीएसआय वैभव पेठकर ,हवालदार विजय होळकर , पोलीस किरण पाटील यांचा चमू अमळगाव येथे   सरकारी वाहनाने आले असता एक युवक संशयास्पद रित्या टेहळणी करतांना दिसला असता पोलिसांनी त्याच्या दिशेने वाहन वळवताच त्याने पळ काढला , तेथे पोलीस पोहचल्यावर अंधारात बस स्थानक भागातील दुकानामागे कार दिसली तेथे जवळ गेल्यावर उघडे दरवाजे पोलिसांनी जाताच बंद करताच मागील सीट वरिल युवकांनी पळ काढला असता विजय होळकर व किरण पाटील यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले तर दोन गाडीतच ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशीत उडवा उडवीची उत्तरे देताच संशय बळावला व गाडीची झडती घेतली असता गाडीत कटर सुरा ,दोरी व धारदार हत्यारे मिळून आल्याने वाहनास चौघांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पंचनामा करून अंग झडती व वाहनाची कसून तपासणी केल्यावर दरोड्यांचा बेतात असल्याने त्यांच्या जवळीक दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आल्याने कारसह १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करून पीएसआय वैभव पेठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे येथील रहिवासी असलेल्या नईमशहा सलीमशहा फकीर वय ३० राहणार ,भोईवाडा- आझादनगर ,धुळे, मोहंमद अशरफ मोहम्मद बशीर अंसारी वय २९ राहणार शहीद अब्दुल हमीद नगर ,धुळे ,आबीदशहा पिरणशहा फकीर वय २६ राहणार- शहीद अब्दुल हमीद नगर ,धुळे, अतिकुररहेमान मोहम्मद सलीम अन्सारी वय वय ३७ राहणार ११ नंबर रेशन दुकान शेजारी ,आझाद नगर धुळे या तरुणांविरुध्द दरोड्यांची पूर्व तयारी व सामूहिक नियोजित  कट रचणे आशा विविध कलमान्वये सकाळीच गुन्हा दाखल करून लागलीच अटक करण्यात आली