लोक न्यूज-

आज दिनांक ०३/०७/२०२१ पोनि, जयपाल हिरे यांचे माहितीवरुन स.फौ. संजय पाटील तसेच चालक हेकॉ, मधुकर पाटील अशांनी पातोडा ता. अमळनेर परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक सुरु आहे या माहितीवरुन सापळा रचत MH १९ CZ३४३८ हे वाळूने भरलेले ट्रक्टर पकडले सदर ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेवून पळून गेला त्याबाबत गोपनीय माहिती काढली असता सदर ट्रॅक्टर महेश सुनिल पवार रा. नांद्री ता. अमळनेर याचे असल्याचे समजले. यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलीस स्टेशनला आणून चालक मालक महेश सुनिल पवार रा. नांद्री ता. अमळनेर याचेविरुध्द पोना, हिरालाल देविदास पाटील यांचे फिर्यादवरुन भादंवि कलम ३७९, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास हेकॉ, सुनिल रामदास पाटील हे करीत आहेत.

तसेच अमळनेर पोलीस स्टेशन दिनांक १६/१०/२०२० रोजी प्रकाश बारकू महाजन (तलाठी) गांधली ता. अमळनेर) यांना त्यांचे पथकासह ट्रॅक्टर क्रं. MH १९BG३१५३ हे अवैध वाळू चोरी करत असतांना मिळून आल्याने सदर ट्रॅक्टर चालकाने पथकास पाहून ट्रॅक्टर पळवून नेलेबाबत अमळनेर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये दिनांक ०२/०७/२०२१ रोजी सदर ट्रॅक्टर मालक अय्याज राजमोहमंद बागवान वय २८ वर्षे रा. इस्लामपुरा अमळनेर यास अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने २ दिवस पोलीस कोठडी दिली असून गुन्हयातील ट्रॅक्टर क्रं. MH १९ BG ३१५३ हे आज रोजी जप्त केले आहे. सदर ट्रॅक्टरवरील चालक हा फरार असून सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सफौ, सुभाष साळुंके हे करीत होते ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना, राजेश शिवसिंग चव्हाण हे पोनि, जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाने करीत आहेत.