लोक न्यूज-
अमळनेर -लोक न्यूज
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी आमदार निधी तसेच २५१५ निधीच्या अंतर्गत मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत पिळोदे येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात प्रामुख्याने २५१५ या योजनेअंतर्गत गावातील आदिवासी समाजाच्या वस्ती मध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे अंदाजित रक्कम ५ लक्ष, २५१५ अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित रक्कम ३ लाख, तसेच गावाच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील,पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, तसेच दिपक पाटील, एल.टी.पाटील, संभाजी पाटील, शाम पवार, प्रा.सुरेश पाटील, संजय पाटील, दिपक पाटील, भय्यासाहेब पाटील, पंकज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिळोदे गावातील होणाऱ्या विकास कामांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान होते. यावेळी पिळोदे सरपंच भारती पाटील, उपसरपंच पदमाबाई पारधी, सदस्य आत्माराम पाटील, जया पाटील, तिलोत्तमा पवार, आशिष शिंदे, आशाबाई कोळी, शबनमबी पिंजारी, कविता संदानशिव, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच नरेंद्र पाटील, चेअरमन निळकंठ पाटील, विकासो माजी चेअरमन विकास पवार, जिजाबराव बोरसे, दिनकर पवार, प्रभाकर पवार, हरी निकुंभ, ग्रामसेवक पवनकुमार वाघ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*युवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश*
सत्तेच्या माध्यमातुन जास्तीत जास्त विकासकामे मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेला बळकटी देण्याचं कामात महत्वाचं योगदान युवकांच असत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावातील गिरीश पाटील, अमोल खैरनार, दीपक पाटील, मुन्ना राजधर पाटील, मुन्ना सखाराम पाटील, नितीन पवार, आकाश पाटील, मिलिंद पाटील, सचिन पाटील, कईम पिंजारी, किशोर निकुंभ, भरत पाटील, हर्षल गुरव, रविंद्र भिल, पंजाबराव पाटील यासह मोठ्या संख्येने युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.