लोक न्यूज-
अमळनेर-औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करून पुन्हा भाजपचे सभापती प्रफुल्ल पाटील हे पुन्हा सभापती पद मिळवण्यास इच्छुक असून कायदेशीर पद्धतीने विराजमान केले नाहीतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
अमळनेर कृ.बा समितीवर शासनाने प्रशासक बसवून प्रफुल पाटील यांचे सभापती पद काढून घेतले होते त्याविरुद्ध माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी कोर्टात धाव घेऊन पुन्हा आपल्या बाजूने न्याय मिळावा दरम्यान आमदार अनिल भायदास पाटील यांनी राजकीय खेळी करून तिलोत्तमा पाटील यांना अशासकीय सभापती पद दिले होते.औरंगाबाद कोर्टाने पुन्हा जुने संचालक मंडळ यांनी विराजमान होण्याची संधी दिली पण कुठलेही पत्र नसल्याने त्यांना आवारातून हुसकावून देण्यात आले याविरुद्ध प्रफुल पाटील, श्रावण ब्रह्मे,पराग पाटील,प्रकाश पाटील व डी. ए. धनगर यांनी लेखी अर्ज करून सचिव यांच्या कडे दाद मागितली व दाद न दिल्यास उपोषनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान दिवंगत उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाने सभापती प्रफुल पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे तर राजकीय शक्ती वापरून प्रफुल्ल पाटील यांचे पद हिसकवण्यात आले त्यामुळे अमळनेर कृ.बा.समितीत सावळा गोंधळ निर्माण झाला आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यानी लोक न्युजला दिल्या आहेत.