अमळनेर - लोक न्यूज

दर सोमवारी आठवडे बाजार आता  भरणार नाही त्या दिवशी सर्व व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवतील असा बैठकीत चर्चा दरम्यान निर्णय झाला आहे. व येत्या शनिवारी बाजार सुरू राहील असे ठरले असून आठवडे बाजाराबाबत  प्रशासनाने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित बैठकीत प्रांताधिकारी सीमा अहिरे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीच्या चर्चे दरम्यान  शनिवार बंद चा निर्णय मागे घेतला असून आता सोमवारचा आठवडे भरणारा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. असा निर्णय झाला. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी बुधवारी सोशल डिस्टनसिंग व मास्क या नियमांचे पालन करत सभागृहात बैठकीत सर्व व्यापारी संघटना यांचे प्रतिनिधी यांनी हजर राहावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.