लोक न्यूज-
अमळनेर-महाराष्ट्र शासनाने दुट्टपी भूमिका घेऊन अमळनेर कृ. बा. समितीवर प्रशासक बसविले होते. त्याबाबत अखेर कोर्टाने न्याय देऊन ते प्रशासक उठविल्याचा निर्णय दिला आहे याबाबत माजी आमदार स्मिता वाघ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमळनेर कृ. बा. समितीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले या बाजार समितीत अमळनेर चोपडा,पारोळा,यावल,रावेर ,शिंदखेडा येथील शेतकऱ्यानी आपला माल विक्री साठी आणला असता त्यांना फायदा मिळाला कोरोना काळात सर्व शासकीय नियम पाळून या आजराविरुद्ध युद्ध पुकारले असे असता महाराष्ट्र शासनाने प्रशासक नेमले पण याला औरंगाबाद खंडपिठात आव्हान देण्यात आले कोर्टाने माजी आमदार स्मिता वाघ यांच्या टीमला चार्ज घेण्यास होकार दिला आहे.पुन्हा बीजेपी टीम चार्ज घेण्यास अतूर झाली आहे हि एकप्रकारे राजकीय खेळी माजी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे तर भाजपा गोटात आनंद पसरला आहे.
याबाबत आपल्याला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया माजी आमदार स्मिता वाघ यांनी लोक न्यूजला दिली आहे.