लोक न्यूज-
अमळनेर- दिवंगत भाजपा नेते उदय वाघ यांचे तसबीर राजकारण करून अमळनेर कृ.उ.बा.समितीतुन काढण्यात आल्याने जाहीर नाराजी प्रकट झाली होती.
पण उदय वाघ यांची तसबीर पुन्हा सन्मान पूर्वक लावण्यात आल्याने या वादावर अखेर पडदा पडला आहे.
निधन झाल्यावरही महान व्यक्ती महत्व उदय वाघ यांच्या नशिबी असा हा वनवास दिला गेल्याने अमळनेरच्या राजकीय पटलावर याबाबत विरोध झाला होता. पण उदय वाघ प्रेमींनी त्यांचा फोटो पुन्हा या कार्यलयात लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना नियती धडा शिकवेल अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत
तर इतर पुढाऱ्यांच्या तसबीर न हटवता भाजपाने आपली संस्कृती जपली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त लोक न्युज ने प्रसिद्ध केले होते.