लोक न्यूज-
अमळनेर:अमळनेर तालुक्याचा सुपुत्र सचिन मुरलीधर खैरनार यांना पोलीस निरीक्षक या पदी बढती मिळाली आहे.
 सचिन खैरनार यांनी सण 2009 मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षक या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले .प्रशिक्षनंतर त्यांची पहिली पोस्टिंग नक्षलभागातील चंद्रपूर जिल्ह्यात झाली.त्यांनी ह्या भागात सन 2010 ते 2013 असे 3 वर्ष कर्तव्य बजावले आहे.सन 2013
मध्ये त्यांना ए पी आय ची बढती मिळून नाशिक शहर येथे त्यांनी 8 वर्षे कर्तव्य बजवले त्यापैकी 5 वर्षे त्यांनी क्राइम ब्रँच मध्ये सेवा केली.असा यशस्वी जीवन प्रवास असणाऱ्या अमळनेर तालुक्याचे सुपुत्र सचिन खैरनार यांचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली आहे.ते विनोद पाटील पत्रकार यांचे लहान बंधू होत. परिसरातून  सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.